top of page

वेदनांना अंत ‌‍नाही‌.

वेदनांना अंत ‌‍नाही‌.

पार कोलमडून पडले तरी धराया कोणी नाही.

आसवांना दिशा दाही. पण वाचवावयास कोणी नाही.

नको थकल्या जीवा धीर सोडू नको.

ईश्वराचे सानिध्य ज्यास. दूजा आधार शोधू नको.

जन्मा बाळ येई ललाटी घेऊन भाग्य.

सोसण्या देई बळही तोच विश्वास धरी वेड्या जीवा.

कधीही न संपणारी साथ ईश्वराची.

नको फुके भय वेड्या,अर्थहीन सारे.

एक त्याचे नाम खरे.



ree

रत्नप्रभा....

 
 
 

Comments


©2020 by micup.in

bottom of page