top of page

थोडक्यातच आनंद सारा





दूर क्षितिजाच्या पल्याड विखुरलेल्या अस्मानाचे ते तेजस्वी रुपडे।

रविराजाचे मावळते केशरी सतेज रुप सुधांशुचे सफेद चंदेरी देखणे स्वरुप।

मोकळे आसमंत सळसळणारा वारा। चिवचिवणारे पक्षी आता येतील पावसाच्या धारा। या वर्षी उन्हाची काहिली तनावर नाहीतर तर ह्दयांवर स्पंदने उमटली। मानवतेच्या गोड स्वप्नांना जणु झालर दुःखाची लागली। थोडक्यातच आनंद सारा। अति तिथे होते माती। नको रे प्रभु आता सहने होत नाही। नंदनवन तुझेच हे सारे त्याचे स्मशान होऊ देऊ नकोस। तारणारा मारणारा जपणारा सारा खेळ तुझ्या मायेचा। लीन बालके आम्ही सारी आटोप आता तरी डाव हा विनाशाचा। डाव हा विनाशाचा। मुक्त केलीस सृष्टी सारी मग आम्हांसच का हे कोंडणे। अपेक्षांच्या धारेवर आम्हांसच का धरणे। हसुखेळू दे अंगणात बागडू दे। आमची चिल्लीपिल्ली सारी। ही एकच आस प्रभु पुरवी।।

रत्नप्रभा

 
 
 

留言


©2020 by micup.in

bottom of page